Anil deshmukh team lokshahi
ताज्या बातम्या

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

Published by : Shweta Chavan-Zagade

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांची न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. १३ मे पर्यंत ही कोठडी वाढली असल्याने त्यांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने आणखी १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस त्यांना कोठडीतच काढावे लागणार आहेत.

२९ एप्रिलपर्यंत त्यांच्यासह अन्य तीन आरोपींची रवानगी न्यालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर, आता सीबीआयच्या विशेष पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे.

दरम्यान, देशमुख सध्या सीबीआय कोठडीत आहेत. आज त्यांना आणखी १४ दिवसांची कोठडी वाढवून देण्यात आली आहे. ज्या पोलिसांच्या बदल्यांबाबत तपास करायचा आहे त्यांची चौकशी करायची असल्याने देशमुख यांना मध्यंतरी तीन दिवस अधिक कोठडी द्यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली होती. सीबीआयने रिमांडसाठी दिलेली कारणे असमाधानकारक आहेत, असे मत न्यायालयाने व्यक्त करत त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आज त्यावर पुन्हा न्यायालयाने निर्णय दिला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी