ताज्या बातम्या

मनसेचा दीपोत्सव म्हणजे आचारसंहितेचा भंग; अनिल देसाईंची निवडणूक आयोगात तक्रार

मनसेच्या दीपोत्सवाबाबत उद्धव ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. नियमबाह्य परवानगी आणि आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचा आरोप.

Published by : shweta walge

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवाजी पार्क येथे दिवाळीत दीपोत्सव साजरा केला जातो. या दीपोत्सवात मोठी आणि आकर्षक रोषणाई, दिव्यांची झगमगाट आदी पाहायला मिळत आहे. यावरुन दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सचिव अनिल यांनी केला आहे. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला तक्रार करणारे पत्र लिहिलंय.

पत्रात काय म्हटलंय?

छत्रपती शिवाजी पार्क,दादर येथे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करायला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगी बाबत तसेच ह्या कार्यक्रमस्थळी मनसेचे स्थानिक माहीम विधानसभेचे उमेदवार अमित राज ठाकरे हे उपस्थित राहिल्याने सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा.

या मागण्यांसाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगमजी यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,सचिव अनिल देसाई यांनी भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करण्यात आला. याला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे परवानगी देण्यात आली. ही देण्यात आलेली परवानगी नियमबाह्य असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

तसेच या कार्यक्रमस्थळी मनसेचे स्थानिक माहीम विधानसभेचे उमेदवार अमित राज ठाकरे हे उपस्थित राहिले होते. त्यामुळे या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट