अंधेरीतील गोखले पूल लवकरच सुरु होणार आहे. अंधेरी पूर्व - पश्चिम भागाला जोडणाऱ्या गोखले पुलाची पहिली गर्डर रेल्वे रुळांच्या वर स्थापित केल्यानंतर ती खाली आणण्याचे आव्हानात्मक काम सध्या सुरू असून ती ३.५० मीटरपर्यंत खाली आणण्यात अभियंत्यांना यश आले आहे. हे काम १९ जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुलाची उर्वरित कामे करण्यात येणार आहेत.
तुळई नियोजित उंचीवर खाली आणल्यानंतर मार्गिकेची पुढील कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. गोखले पुलाची १३०० टन वजनाची तुळई ७.५ मीटर खाली उतरवण्यासाठी अधिक कालावधी लागत आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पुलाची एक मार्गिका १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले असल्याची माहिती मिळत आहे.
१९ जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुलाची उर्वरित कामे करण्यात येणार आहेत. या पुलाची एक मार्गिका १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर करत आहे.