Anandrao Adsul  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Anandrao Adsul : शिवसेनेला अजून एक धक्का; शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेनेला (shivsena) अजून एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul)  यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhvh thackeray ) यांना राजीनाम्याचे पत्र  पाठवले  आहे.  ईडीने केलेल्या कारवाईवेळी तसंच आजारपणात विचारपूसही न केल्यामुळे आनंदराव अडसूळ यांनी उध्दव ठाकरेंना पत्राद्वारे व्यक्त केली आहे.अमरावती (amravati) लोकसभा मतदारसंघातून ते निवडून यायचे. परंतु अपक्ष उमेदवार नवनीत राणा (navneet rana ) यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता. शिवसेनेत नेतेपद ही अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

सिटी कोऑपरेटिव्ह बँक बँकेतल्या कथिक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची चौकशी करण्यात आली होती.सिटी को-ऑपरेटीव्ह बँक या बँकेचे अडसूळ अध्यक्ष होते. ज्यावेळी ईडीने कारवाई केली त्यानेळी पक्षाने साधी विचारपूस केली नाही.

एकनाथ शिंदे ( eknath shinde) यांच्या बंडानंतर ४० आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. अनेक माजी आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ हे एकनाथ शिंदे गटासोबत अगोदरपासूनच आहेत. आता अडसूळ यांनीही राजीनामा दिला आहे. मात्र अडसूळ शिंदे गटात जाणार की नाही असा प्रश्न समोर आहे.

अडसूळ हे को-ऑप क्षेत्रातील मोठे नाव आहे. राज्यातील सर्व सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांची युनियन आहे. अडसूळ हे गेल्या अनेक वर्षांपासून या युनियनचे नेतृत्व करत आहेत. सेनेचे लोकसभेतील आपला प्रतोदही बदलला आहे. भावना गवळी यांच्या जागी राजन विचारे यांची नियुक्ती केली आहे

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने