Anand Dave Team Lokshahi
ताज्या बातम्या

"शरद पवारांनी शिवचरित्र लिहून महाराजांवर झालेला अन्याय दूर करावा"

Published by : Sudhir Kakde

बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणं आणि त्यांच्या लिखानाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कोणीच केला नाही असं परखड मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवार पुण्यात आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरूनच आता राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. यावरच हिंदू महासंघाने आक्रमक होत शरद पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मण संघटनांना भेटायला बोलावलं होतं, तेव्हा आम्ही त्यांची भेट नाकारली होती. शरद पवार यांना ब्राह्मण द्वेषाचं राजकारण करायचं आणि त्यांच्या विचारात काही फरक पडणार नाही हे कारण सांगून आम्ही ती भेट नाकारली होती. दुर्दैवानं आमची ती भीती खरी ठरली. आज शरद पवार यांनी बोलताना बाबासाहेब पुरंदरेंनी छत्रपतींवर अन्याय केला असं वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत असं वक्तव्य हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हंटल आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि त्यांच्या लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कुणीही केला नाही, तसेच शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेवांचं योगदान काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवचरित्र ग्रंथ प्रकर्षण सोहळा आज पुण्यामध्ये पार पडला यावेळी भाषणात शरद पवार यांनी असं परखड मत व्यक्त केलं आहे. पण श्रीमंत कोकाटेंनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. भारतात अनेक राज्यकर्ते झाले. मौर्यांचे राज्य, अशोकाचे राज्य, यादवांचे राज्य... पण शिवाजी महाराजांचे राज्य यापासून वेगळे होते. कारण त्यांच राज्य कधी भोसल्यांचं राज्य झालं नाही ते रयतेचं राज्य म्हणूनच ओळखल गेलं. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला. ज्यांचा मातीशी संबंध आहे असा. शिवछत्रपतींचा उल्लेख करताना काही जणांनी धर्मांध चित्र रंगवण्याचा, संकुचित चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण श्रीमंत कोकाटेंनी सत्य मांडलं.'

अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...