ताज्या बातम्या

ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून कानशिलात मारली; अंधेरी परिसरातील धक्कादायक घटना

मुंबईतील अंधेरी परिसरात पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून धमकी देऊन कानशिलात लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

रिध्देश हातिम, मुंबई

मुंबईतील अंधेरी परिसरात पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून धमकी देऊन कानशिलात लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अंधेरीतील चार बंगला म्हाडा परिसरात घडली. कांदिवली च्या चारकोप परिसरात गॅब्रियल डॉमनिक फर्नांडिस राहत असून वर्सोवा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. 22 एप्रिल ला फिर्यादी अर्पित गर्गे हे वर्सोवा पोलीस ठाण्यात आले होते. त्यांच्या तक्रारीप्रमाणे चार बंगला म्हाडामध्ये फिल्म प्रमोशनचे एक कार्यालय आहे. या कार्यालयात एक व्यक्ती जबरदस्तीने प्रवेश करून त्यांच्या ऑफिस बॉय याला जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केल्याची तक्रार केली.

या तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक हे पथकासोबत त्यांच्या कार्यालयात गेले असता त्यावेळी पोलिसांनी आरोपी याला ठाण्यात यायला सांगितले मात्र त्यांनी पोलीस ठाण्यात येण्यास नकार दिला व त्यांनी पोलिसांची हुज्जत घातली की तुमच्याकडे वॉरंट आहे का, तुम्ही येते कशाला आले तुमची वर्दी काढून टाकतो अशी धमकी दिली. मात्र पोलिसांनी त्यांना शांतपणे सांगितले की फिर्यादी यांनी तक्रार केली आहे त्यामुळे तुम्हाला पोलीस ठाण्यात यावे लागेल मात्र आरोपीने रागाच्या भरात पोलीस उपनिरीक्षक यांच्या कानशिलात दोन ते तीन वेळा चापट मारली. दरम्यान उपस्थित इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केले असता आरोपीनी त्यांच्याशीही हुज्जत घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

घडलेल्या प्रकार वरिष्ठांना सांगितल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक यांच्या तक्रारीवरून आरोपी यांच्या विरोधात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करून शिवीगाळ करून धमकी देणे तसेच सरकारी कामात अडथळा आणण्या प्रकरणी गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. अटक आरोपीचे नाव लालजी वाघ असून पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news