ताज्या बातम्या

Amravati : अमरावती ग्रामीण पोलिसांची भरती स्थगित

ऐन पावसाळ्यात पोलीस भरती घेतल असल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

सूरज दहाट, अमरावती

राज्यातील पोलीस भरतीवरून राजकारण तापले आहे. ऐन पावसाळ्यात पोलीस भरती घेतल असल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. यातच राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता अमरावती ग्रामीण पोलिसांची भरती स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र अमरावती शहर पोलिसांची भरती प्रक्रिया पूर्ववत आहे. मैदानात पावसामुळे चिखल साचल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पावसामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी आजची पोलीस भरती पुढं ढकलली आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी आलेले विद्यार्थी घरी परतले आहेत. याची पुढील तारीख लवकरच कळवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

पुणे एअरपोर्टवरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार; 'या' तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता

निफाड तालुक्यातील भाजपचे यतीन कदम शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना

पिंपरी-चिंचवडच्या भोसरीत पाण्याची टाकी कोसळली; 2 ते 3 कामगारांचा मृत्यू