अमरावती पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दोन कामबंद आंदोलन करण्यात येत होते. सहाव्या, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, महागाई भत्ता देण्याची मागणी त्यांची आहे. मागण्यापूर्ण होईपर्यंत कामावर परतणार नाही असा कर्मचाऱ्यांनी म्हटले होते.
यातच आता अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित झाला आहे. मनपा आयुक्त देवीदास पवार यांच्या सकारात्मक चर्चेनंतर संघटनेद्वारे संप मिटला असल्याची माहिती मिळत आहे.