ताज्या बातम्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट; महिलांकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

अमरावतीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Published by : Team Lokshahi

सूरज दहाट, अमरावती

राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सर्वच महिला या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहे. अमरावतीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. योजनेसाठी कागदपत्रं काढण्यासाठी आलेल्या महिलांची लूट होत असल्याचे दिसत आहे.

महिलांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप करण्यात येत असून वरुड तालुक्यातील सावंगी तलाठी कार्यालयातील हा प्रकार आहे. महिलांकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रत्येक लाभार्थी महिलेकडून 50 रुपये घेत असल्याची माहिती मिळत आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश