ताज्या बातम्या

Cash Seized From Bhiwandi: भिवंडीत एटीएम बँकेत तब्बल दोन कोटी तीस लाखांची रोकड जप्त

सोमवारी सायंकाळी एका वाहनाच्या तपासणीत बँक एटीएम व्हॅनवर कारवाई करून 2 कोटी 30 लाख 17 हजार 600 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Published by : Team Lokshahi

सोमवारी सायंकाळी एका वाहनाच्या तपासणीत बँक एटीएम व्हॅनवर कारवाई करून 2 कोटी 30 लाख 17 हजार 600 रुपये जप्त करण्यात आले आहेत. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात नारपोली पोलिस ठाणे हद्दीत हा प्रकार घडला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणांसोबतच पोलिसांच्या संयुक्त गस्त पथकाच्या माध्यमातून वाहनांची तपासणी केली जात आहे.

पोलिस पथक धामणकर नाका उड्डाणपूला खाली वाहनांची तपासणी करीत होते. यादरम्यान बँक एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या CMS कंपनीच्या वाहनाची तपासणी केली. व्हॅन मधील रोख रक्कमे बाबत व्हॅन मधील कर्मचारी रोख रक्कमे बाबत कोणताही कागदोपत्री तपशील अथवा पैशांचे विवरण रक्कमेबाबत पुरावे व रोख रक्कम हाताळणी क्युआर कोड सादर करता आला नाही.

याची माहिती भिवंडी पूर्व विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप यांनी दिल्या नंतर त्यांच्या निर्देशानंतर निवडणूक आचार संहिता नोडल अधिकारी भरारी पथकाने सदरची रक्कम तपासणी करून जप्त करीत रक्कम कोषागारात जमा करण्यात आली असून आयकर निरीक्षक पवन कौशिक हे अधिक तपास अहवाल सादर करणार आहेत त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.

Amit Thackeray : माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे यांचा पराभव; पोस्ट शेअर करत म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव; भाजपचे राजेश वानखडे यांचा विजय

Tivsa Vidhansabha, Amravati : तिवसामधून यशोमती ठाकूर यांचा दारूण पराभव ; कॉंग्रेसला मोठा धक्का

Amol Khatal win Sangamer Assembly Election Result 2024: बाळासाहेब थोरातांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; अमोल खताळ विजयी

Mahayuti PC LIVE: महाराष्ट्रासाठी हा ऐतिहासिक दिवस: मुख्यमंत्री शिंदे