ताज्या बातम्या

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड; संदीप पाटलांचा पराभव

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक काल (गुरुवारी) पार पडली. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत होती.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक काल (गुरुवारी) पार पडली. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत होती. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात होते. एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक हेही पवार-शेलार पॅनेलकडून मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले होते. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे असा सामाना रंगला होता. मात्र अमोल काळे यांनी ही अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. शरद पवार- आशिष शेलार पॅनलकडून ते उभे होते.

शरद पवार आणि आशिष शेलार पॅनल एकत्र आले. आशिष शेलार बीसीसीआय खजिनदार झाल्याने त्यांच्याजागी अमोल काळे यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत अमोल काळे यांना १८३ मतं मिळाली तर संदीप पाटलांना एकूण १५८ मतं मिळाली. म्हणजेच अमोल काळे यांचा २३ मतांनी विजय झाला आहे. एमसीएचे एकूण 380 मतदार आहेत. त्यामध्ये मैदान क्लब्स 211, ऑफिस क्लब्स 78, स्कूल कॉलेज क्लब्स 40 आणि माजी कसोटीवीर 51 असे मतदार होते.

या निवडणुकीत पवार-शेलार पॅनेलचे उमेदवार अमोल काळे यांचा विजय झाला आहे. अमोल काळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे संदीप पाटील हे माजी क्रिकेटपटू आहेत.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...