ताज्या बातम्या

अमित ठाकरे यांच्या प्रचाराला आजपासून होणार सुरुवात

अमित ठाकरे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात, माहीम फिशरमन कॉलनीतून प्रचाराला प्रारंभ. माहीम विधानसभा मतदारसंघात चुरशीचा सामना होणार.

Published by : shweta walge

अमित ठाकरे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात होणार आहे. सकाळी 9 पासून माहीम फिशरमन कॉलनी येथून अमित ठाकरेंच्या प्रचाराला प्रारंभ होणार आहे. अमित ठाकरे यांना माहिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.

अमित ठाकरे हे मध्य मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात पदार्पण करणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीचा सामना होणार हे नक्की आहे.

दरम्यान, माहिम विधानसभा मतदारसंघातून सध्या सदा सरवणकर आमदार आहेत. ते एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदे यांनी सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले. पण सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Deepak Kesarkar Sawantwadi Assembly Constituency : दीपक केसरकर चौथ्यांदा गड राखणार?

Economist Bibek Debroy passed away: ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन

नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; भेसळयुक्त 688 किलो मिठाई जप्त

Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात; म्हणाले...

'फडणवीसन यांच्या बाजूने असलेल्या लोकांना 'त्या' मदत करतात' राऊतांचा कोणावर निशाणा?