ताज्या बातम्या

Amit Thackeray : कोळी बांधवांनी भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे ट्विट करत म्हणाले...

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

माहिम मतदारसंघातून मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी मिळाली आहे. यातच कोळी बांधवांनी अमित ठाकरेंची भेट घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

अमित ठाकरे म्हणाले की, आज धनतेरसच्या पवित्र दिनी आपले कोळी बांधव आणि भगिनी माझी भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर आले. हा क्षण माझ्यासाठी अतिशय भावनिक होता, कारण त्यांनी एकविरा मातेच्या चरणी ओटी अर्पण करण्यासाठी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला - फक्त आणि फक्त माझ्या विजयाचा आशीर्वाद मागण्यासाठी!

त्यांच्या मते, माझा विजय म्हणजे त्यांचाच विजय आहे. तुमचे हे पाठबळ आणि आशीर्वाद यामुळेच माझ्या प्रत्येक निर्णयाला अर्थ मिळतोय. आपण सर्वजण या प्रवासात माझ्या सोबत आहात, यासाठी मनःपूर्वक आभार!असे अमित ठाकरे म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 6 नोव्हेंबरला मुंबईत सभा

Satara: जिल्ह्यात 215 जणांचे अर्ज; चुरस वाढली

राजकीय पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; नाराजांकडून थेट अपक्ष अर्ज

नवी मुंबईच्या खारघरमधून 27 लाखांचं ड्रग्ज जप्त

Salman Khan : अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी