अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय हद्दीत घुसखोरी करू पाहणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी पिटाळून लावले. तवांगच्या यांगत्से येथे 9 डिसेंबरला उभय देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. हे चिनी सैनिक भारतीय लष्कराची चौकी हटवण्यासाठी आले होते. पण भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर देत सडेतोड उत्तर देत चिनी सैनिकांचे मनसुबे उद्ध्वस्त केले. या चकमकीत दोन्ही देशांचे काही सैनिक जखमी झाले. भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा चिनी सैनिकांचा सुनियोजित कट होता. भारतीय चौकीवर हल्ला करण्यासाठी चिनी सैनिकांची 15 दिवसांपासून तयारी सुरू होती. ठरलेल्या रणनीतीनुसार सोमवारी 17 हजार फूट उंचीवर यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी चीनचे 300 सैनिक पोहोचले होते.भारतीय सैनिक आक्रमक झाल्याचे लक्षात आल्यावर चिनी सैनिकांनी माघार घेतली. पण यादरम्यान चिनी सैनिकांनी दगडफेक केल्याचे सांगितले जाते. या संघर्षात दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले. सहा भारतीय जवानांना गुवाहाटीत उपचारासाठी नेण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शाह प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह म्हणाले की, "हे भाजपचं सरकार आहे. एक इंचही जमीन कोणी घेऊ शकत नाही," नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत एक इंचही जमीन कोणी घेऊ शकत नाही. भारतीय सैन्याने तवांगमध्ये दाखवलेल्या पराक्रमाचं मी कौतुक करतो. त्यांनी काही वेळातच घुसखोरी करणाऱ्या चिनी सैन्याला माघारी पाठवलं आणि भारतीय भूमीची रक्षा केली." तर "2011 मध्ये काँग्रेस सरकारने चीनच्या धमकीनंतर सीमेवरील बांधकाम थांबवलं. काँग्रेस सरकारच्याच कार्यकाळात हजारो एकर जमिनी बळकावल्या होत्या," असा आरोप त्यांनी केला आहे.
"फाऊंडेशनने आपलं रजिस्ट्रेशन सामाजिक कार्यांसाठी केलं होतं. जी रक्कम चिनी दूतावासाकडून मिळाली त्याचा वापर भारत चीन संबंधांच्या विकासाच्या शोधावर खर्च करण्यात आला, असं सांगितलं जातं. आता या शोधामध्ये 1962 भारताची जी हजारो हेक्टर भूमी चीनने हडप केली त्याचा समावेश होता का? शोध केला तर त्याचा अहवाल काय होता? असे त्यांनी म्हटले आहे. "राजीव गांधी फाऊंडेशनला 2005-06 आणि 2006-07 या वर्षात चिनी दूतावासाकडून 1 कोटी 35 लाखांचं अनुदान मिळालं. शिवाय इस्लामिक रिसर्च फाऊंडेशचा प्रमुख झाकीर नाईकने 7 जुलै 2011 रोजी राजीव गांधी फाऊंडेशला 50 लाख रुपयांचा निधी दिला होता, असे अमित शहा म्हणाले.