Amit Shah 
ताज्या बातम्या

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Published by : Naresh Shende

Amit Shah Interview : काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यानं म्हटलंय, उत्तर भारत आणि दक्षिण भारताचं विभाजन करा. काँग्रेस पक्ष याच भूमिकेवर ठाम आहे. पण या देशाचं विभाजन कधीही होणार नाही. देशाच्या जनतेनं विचार केला पाहिजे की, काँग्रेस पक्षाचा अजेंडा काय आहे? केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक ही पाच राज्य मिळून या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष बनणार आहे. जोपर्यंत या देशात भाजपचा एक जरी खासदार असला, एसटी, ओबीसी, एससीच्या आरक्षणाला कुणीही हात लावू शकत नाही. एससी,एसटी,ओबीसींचा नरेंद्र मोदींपेक्षा मोठा समर्थक कुणीही नाही, असं मोठं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन बाबू यांच्यात वैयक्तीक टीकाटीप्पणी सुरु होती, ओडीसात याआधी असं काही झालं नव्हतं, यावर प्रतिक्रिया देताना अमित शहा म्हणाले, सध्याच्या परिस्थितीला पाहून कोणताही नेता वक्तव्य करत असतो. आताची स्थिती पाहूनच पंधानमंत्र्यांनी तसं विधान केलं. या ठिकाणी सरकरा बदलेल, असं मलाही वाटतंय. यावेळी दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपचं सरकार स्थापन होईल.

काश्मीरमध्ये शांतता आणि बंगालमध्ये हिंसा अशी परिस्थिती यावेळी निर्माण झालीय, यावर प्रतिक्रिया देताना शहा म्हणाले, जे लोक कलम ३७० वर प्रश्न उपस्थित करतात, मला त्यांना विचारायचंय की, याआधी निवडणुकांमध्ये बहिष्कार टाकलं जायचं. आता लाठीचार्ज न होता शांतीपूर्ण वातावरणात मदतान होत आहे. या गोष्टींमुळे निश्चितच असं वाटतं की, बदल झाला आहे. पहिल्यांदाच विस्थापीत ४० टक्के पंडीतांनी मतदान केलं आहे. याआधी हा आकडा ३ टक्क्यांच्या पुढे गेला नव्हता. जनतेत खूप आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

आम्ही लोकाशाहीसोबत जाऊ शकतो, असं त्यांना वाटतं. काश्मीरमध्ये परिवर्तन होईल. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष परिवारवादी आहेत. सर्व पक्ष म्हणतात, आम्ही ३७० कलम पुन्हा लागू करू. त्रिपल तलाक पाहिजे, अशी आघाडीतील सर्व पक्षांची इच्छा आहे. सर्व पक्ष सीएएचा (नागरिकत्व सुधारणा कायदा) विरोध करत आहेत. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत.

इंडिया आघाडीत अशाच प्रकारचं कल्चर आहे. एका साच्यात सर्व पक्ष अडकलेले आहेत. १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार करणारी इंडिया आघाडी पाहिजे की, मुख्यमंत्री प्रधानमंत्री राहून २३ वर्ष ज्यांच्यावर २५ पैशांचाही आरोप नाही, असे नरेंद्र मोदी पाहिजेत. हे देशाच्या जनतेनं ठरवायचं आहे, असंही शहा म्हणाले.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा