shockeing video | american woman team lokshahi
ताज्या बातम्या

''तुम इंडियंस से नफरत करती हूं...जहां जाती हूं, नजर आ जाते हो', अमेरिकेत भारतीयांना शिवीगाळ करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेत भारतीयांना शिवीगाळ करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल

Published by : Shubham Tate

shockeing video : अमेरिकेतील टेक्सासमध्ये चार भारतीय-अमेरिकन महिलांच्या एका गटाने केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेला अटक केली आहे. व्हिडिओमध्ये आरोपी महिला भारतीय-अमेरिकन महिलांना भारतात परत जाण्यास सांगताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहे. (america racist attack in texas on indian womens shockeing video goes viral mexican american woman)

टेक्सासमधील डलास येथील एका पार्किंगमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. व्हिडिओमध्ये आरोपी महिला मेक्सिकन-अमेरिकन असल्याचे भासवत आणि भारतीय-अमेरिकन महिलांच्या गटावर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडीओमध्‍ये महिला "मला तुझा भारतीयांचा तिरस्कार आहे. हे सर्व भारतीय अमेरिकेत येतात कारण त्यांना चांगले जीवन हवे असते. या मेक्सिकन-अमेरिकन महिलेचे नाव प्लॅनो येथील एसमेराल्डा अप्टन असे आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करणाऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, "ही घटना माझी आई आणि तिच्या तीन मित्रांसोबत डॅलस, टेक्सासमध्ये घडली."

व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीची आई व्हिडिओमध्ये मेक्सिकन-अमेरिकन महिलेचा निषेध करताना आणि वांशिक अपशब्द वापरू नका अशी विनंती करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आरोपी महिला असेही म्हणताना दिसत आहे की, "मी कुठेही जाते... तुम्ही भारतीय सर्वत्र आढळतात. जर भारतातील जीवन सर्वोत्कृष्ट आहे, तर तुम्ही येथे का आहात." नंतर ती अपशब्द वापरून ओरडते आणि भारतीय महिलांना मारहाण करण्यास सुरुवात करते.

प्लानो पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी आरोपी महिला एस्मेराल्डा अप्टन हिला अटक केली. त्याच्यावर प्राणघातक हल्ला, शारीरिक इजा आणि दहशतवादी धमक्या दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या रीमा रसूल यांनी या घटनेचा निषेध करत ट्विट केले की, "हे अतिशय भयावह आहे. तिच्याकडे खरोखर बंदूक होती आणि तिला गोळी घालायची होती... या महिलेवर वांशिक गुन्ह्याचा खटला चालवला गेला पाहिजे."

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news