विधानपरिषदेत अंबादास दानवे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अंबादास दानवे यांच्याकडून विधानपरिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
यावर आता माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने नियम आणि कायदे शिकवायची गरज नाही आहे. भारतीय जनता पार्टीने राहुल गांधींना संसदेतूत निलंबित केलं होते. भारतीय जनता पार्टीने दिडशे खासदारांना निलंबित केलं होते. त्यांनी मला असं वाटतं संसदीय भाषा, संसदीय नियम आणि कायदे उद्धवजी ठाकरे साहेबांना, मला शिकवण्याची गरज नाही.
यासोबतच ते म्हणाले की, आता त्यांना नियम, कायदे, संविधान आठवायला लागले आहे. इतके दिवस त्यांना कायदे त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते. आता त्यांना कायदे नियमांची जाणीव झाली चांगली आहे. मी शिवसैनिक आहे आणि शिवसेनेच्या बाण्याने मी उत्तर दिलेलं आहे. असे अंबादास दानवे म्हणाले.