Ambadas Danve  
ताज्या बातम्या

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीचा ठाकरे गटाला पाठिंबा? अंबादास दानवेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "आमची लढाई..."

Published by : Naresh Shende

Ambadas Danve Press Conference : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड कल्याण-डोंबिवली लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत, यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे पत्रकार परिषदेत म्हणाले, धार्मिक कार्यक्रम होता. शिवसेना नेते संजय राऊत त्या कार्यक्रमाला गेले होते. तसच आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीही त्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे असं म्हणता येणार नाही, भाजपचा छुपा पाठिंबा आहे. कारण आमची लढाई भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे असं काही झालं आहे, किंवा होईल, असं मला वाटत नाही.

आनंदराव अडसूळ यांची भेट राणा दाम्पत्य घेणार आहेत, यावर बोलताना दानवे म्हणाले, अडसूळ काहीच करु शकत नाही. त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांचे हात बांधून ठेवले आहेत. ते कठपुतळी सारखे आहेत. भाजप त्यांना नाचवेल, तसं त्यांना नाचावं लागणार आहे. सांगलीतून विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, यावर बोलताना दानवे म्हणाले, महाविकास आघाडीचा जागावाटप झालं आहे. त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी जर अपक्ष निवडणूक लढवत असेल, तर निवडणूक ही एकाच मतदारसंघात नाही, महाराष्ट्रात ४८ मतदारसंघात निवडणूक आहे. विशाल पाटील मागील निवडणूक शेतकरी संघटनेकडून लढले.

ते काँग्रेसमधून उभे राहिले नव्हते. काँग्रेसचं नेतृत्व या सर्व गोष्टींबाबत योग्य पावले उचलतील. विशाल पाटील चांगले कार्यकर्ते आहेत. पण मविआला ही जागा सुटली तर त्या जागेवर मविआ लढेल. काँग्रेसनं ही जागा स्वत:ला सोडून घ्यायची होती. पण तसं काही झालेलं नाही. चंद्रहार पाटील शिवसेनेचे उमेदवार आहेत, हेच तिथे लढतील. मला असं वाटतं, विशाल पाटील जेव्हा अर्ज मागे घेतील, तेव्हा चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देतील. सांगलीच्या प्रतिष्ठेची लढाई शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी झाल्याचं पाहायला मिळत आहे, यावर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले, स्थानिक राजकारण असतं. एकमेकांवर टीका-टीप्पणी होत असते.

नितेश राणे सरपंचांना दम देतात, यावर दानवे म्हणाले, जनता सुजाण आहे. राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या निवडणूक आयोगाने या विषयावरही लक्ष दिले पाहिजे. सत्ताधारी पक्ष कशाप्रकारे बेजबाबदार वक्तव्य करतात, हे जनता पाहते. निवडणूक आयोग यांच्या माजोरीपणाला कशाप्रकारे डोळेझाक करतात, हे जनतेला दिसत आहे. जनता त्यांना योग्य चपराक देईल, असंही दानवे म्हणाले.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकडवाड यांचं प्राबल्य आहे. अशातच आता गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी खासदार संजय राऊत यांच्यासोबत एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. परंतु, सुलभा गायकवाड यांनीही पत्रकार परिषद घेत आम्ही भाजपलाच पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आणि या चर्चांना पूर्णविराम लावला.

अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...