पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला. गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बदलापूर अत्याचाराच्या आरोपीचा मृत्यू झाला आहे. अक्षयनं बंदुक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात एक पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ही घटना घडली आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या की, बदलापूरचा हरामखोर नराधम ठार झाला…
त्याला जागच्या जागी फाशी झाली पाहिजे, अशी मागणी करणारे विरोधक आता चौकशीची मागणी करतात…
किती दुटप्पीपणा ?
आपल्या पोलिसांवर एखादा आरोपी हल्ला करीत असेल तर काय त्याची आरती करायची..?
बदलापूरच्या नराधमाचा विरोधकांना इतका पुळका का..?
की नुसते राजकारण करणार..?
राजकारण करणार्यांना या विरोधकांना लाज वाटली पाहिजे..