ताज्या बातम्या

Ujjwal Nikam : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता याच प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

तळोजा जेलमध्ये पोलीस आरोपीचा ताबा घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्याला बदलापूरला घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केले. यामधील एक गोळी API निलेश मोरे या पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला लागली तर इतर दोन राऊंड मिसफायर झाले.

त्यानंतर सेल्फ डिफेन्ससाठी पोलीस अधिकाऱ्यांनी गोळ्या झाडल्या. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला. गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ही घटना घडली.

याच पार्श्वभूमीवर आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उज्ज्वल निकम म्हणाले की, आज जो बागुलबुआ उभा करण्यात येत आहे की, अक्षय शिंदे आला मुद्दाहून मारण्यात आलं या आरोपात मला काही तथ्य वाटत नाही. याला कारण असं आहे की अक्षय शिंदे याच्या विरुद्ध भक्कम पुरावा एसआयटीने न्यायालयात आरोपपत्राच्या माध्यमातून दाखल केलेला आहे. प्रश्न एवढाच उरतो की, ज्यावेळेला अक्षय शिंदे पोलिसांच्या म्हणण्यानुसार पोलिसांचे हत्यार हिसकावून घेतो तेव्हा पोलिसांनी योग्य खबरदारी घेतली नव्हती का? असे उज्ज्वल निकम म्हणाले.

Big Boss Marathi 5: 100 दिवसाचा खेळ आता 70 दिवसात संपणार, "या" दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; उदय सामंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पुणे महापालिका शहरातील भूमिगत विहिरींचा शोध घेणार

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; खासदार नरेश म्हस्के पोस्ट करत म्हणाले...

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस; प्रकृती खालावली