ताज्या बातम्या

'अजित पवार बारामतीतूनच विधानसभा लढणार' अमोल मिटकरींच वक्तव्य

लाडकी बहीण योजनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उंचावलेली प्रतिमा या गोष्टी आमचे विरोधक जाणून आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक मोरल डॅमज करण्यासाठी केवळ विरोधकांकडून पिकवलेल्या चर्चा असल्याचे मिटकरी यांनी म्हटलं आहे.

Published by : shweta walge

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी ही बारामतीकरांची इच्छा असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उंचावलेली प्रतिमा या गोष्टी आमचे विरोधक जाणून आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक मोरल डॅमज करण्यासाठी केवळ विरोधकांकडून पिकवलेल्या चर्चा असल्याचे मिटकरी यांनी म्हटलं आहे. अजित दादा बारामती सोडणार नाहीत असा दावाही आमदार मिटकरी यांनी केला. दादांनी बारामतीतून लढावं ही बारामती करांची इच्छा असल्याचं ते म्हणाले.

तर लोकसभेत झालेला पराभव जरी वेदनादायक असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीकर भरभरून साथ देतील असा दावाही आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. केवळ विरोधकांकडून चर्चा पेरण्याचे काम केलं जात आहे. त्यामुळे विरोधकांची थोबाड विधानसभा निवडणुकीत बंद होतील असेही मिटकरी म्हणाले.

NEWS PLANET With Vishal Patil | 'लाडकी बहीण' ठरणार गेमचेंजर? लाडक्या बहिणींची कुणाला साथ?

Nilesh Rane | Kokan Vidhansabha | कोकणात कुणाचं वारं? निलेश राणे Exclusive

Mumbai Vidhansabha Poll | मुंबईकरांचा कौल कोणाला? 'या' नेत्यांना मिळणार पराभवाचा धक्का ?

मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

'त्या' प्रकरणी अजित पवार यांना बारामती कोर्टाचे समन्स