थोडक्यात
अजित पवार यांनी बारामती लोणी भापकर येथील सभेत युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधला, त्यांना लगेच आमदारकीची स्वप्न पडली असे म्हटले.
अजित पवार म्हणाले की, त्यांनी पवार साहेबांच्या हाताखाली अनेक वर्ष काम केले आणि त्यानंतर लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली.
अजित पवार यांनी नवीन राजकीय कार्यकर्त्यांना अनुभव आणि कष्टांच्या महत्त्वाची आठवण करून दिली.
मी अनेक वर्ष पवार साहेबांच्या हाताखाली काम केलं आणि त्यानंतर आठ ते दहा वर्षांनी मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली मात्र आता काही जणांना काल काम करायला लागली असून, त्यांना लगेच आमदारकीची स्वप्न पडायला लागली असे म्हणत अजित पवारांनी नाव न घेता युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधला. बारामती लोणी भापकर इथल्या सभेत अजित पवार बोलत होते.
यावेळी एका कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार हे अजित दादांना इंग्लिश बोलता येत नाही असा प्रचार करत असल्याचे सांगितले. यावर भाष्य करताना मला जरी इंग्लिश येत नसलं तरी मी राज्याचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री राहिलो, मी साडेसहा कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. यामुळे त्याला साडेसहा लाख कोटींवर किती शून्य असतात हे तरी माहित आहे का? असा उपरोधिक टोला अजित पवारांनी युगेंद्र पवारांना लगावला.
पुढे ते म्हणाले की, आपल्या तालुक्यातील मुलं काम करीत असतील तर त्याला मलिदा गँग का म्हणता? आज विरोधात बोलायला काही नाही म्हणून ते काहीही मलिदा गँग बोलतात. काम करीत असताना जातीचा आणि नात्या-गोत्याचा विचार केला नाही. गावातले पुढारी नीट वागत नाहीत. त्याचा राग माझ्यावर निघतो. ही निवडणूक झाल्यावर काही नव्या चेहऱ्यांना मी पुढे आणेल. "तुम्ही मला थेट खासदार केलं नाही. त्याआधी मी काम करत होतो. साहेब मुख्यमंत्री झाल्यावर मी तालुक्याला कसा फायदा होईल ते बघितलं? 1989 ला साहेब म्हणत होते, मी अजितला तिकीट देणार नाही, 91 ला मला तिकीट दिलं. आता काही लोकांना काल काम सुरू केलं नाही की, त्यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागली आहेत.
मी जेवढं काम करू शकतो, तेवढं महाराष्ट्रमधील एकही आमदार काम करू शकत नाही. मी एकटा निवडून येऊन काय उपयोग नाही. माझे सहकारी निवडून येणं गरजेचं आहे. जेवढे निवडून येतील तेवढी माझी ताकद वाढेल. त्याचा फायदा बारामती आणि जिल्ह्याला होणार आहे. औटघटकेचा विचार करु नका. मी तुमचे मत वाया जाऊ देणार नाही. विश्वासाल तडा जाऊ देणार नाही अस ते म्हणाले.