Ajit Pawar - Sharad Pawar Team Lokshahi
ताज्या बातम्या

"ऊसाला पाणी जास्त लागतं, त्याऐवजी शेतकऱ्यांनी..."; अजित पवारांचा सल्ला

शरद पवार यांनी ऊस हे आळशी लोकांचं पीक असल्याचं विधान केलं होतं.

Published by : Sudhir Kakde

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. ऊसाचं पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेल्या सल्ल्याने त्यांना टीकेला सामारं जावं लागलं होतं. त्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील ऊसाबद्दल आपलं व्यक्त केलं आहे. ऊसाला पाणी अधिक लागत असल्यानं त्याऐवजी सोयाबीन किंवा इतर चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांना वळवण्याची गरज आहे. कृषी विभागानं त्यादृष्टीनं प्रयत्न करावेत असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनीही ऊस हे आळशी लोकांचं पिक असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता अजित पवार यांनीही असंच विधान केल्यानं त्यांच्या या विधानावर नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांनी आज खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी आणि कृषी निविष्ठांचा पुरेसा पुरवठा करावा, असे निर्देश खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत संबंधितांना दिले. ऊस तोडणीसाठी मनुष्यबळ कमी असल्यानं गाळप बंद झालेल्या कारखान्यांकडील हार्वेस्टर इतर क्षेत्रातील ऊसतोडणीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात येत आहे असंही अजित पवार यांनी सांगितला.

शेतात उभ्या असलेल्या ऊसाच्या वाहतुकीसाठी आणि एकरी तोटा भरून काढण्यासाठी राज्य शासनातर्फे सहकार्य करण्यात येत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha