शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी या मागणीसाठी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झालं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलं आहे. लवकरच तुझा दाभोळकर होईल असे लिहित धमकी देण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, धमकी देणाऱ्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे. धमकी देणाऱ्यांची माहिती मी घेतली. धमकी देण्याचे प्रकार वाढले आहेत. याची तीव्र निषेध. धमकी देणारा हा भाजपाचा कार्यकर्ता आहे. सौरभ पिंपळकर याच्या अकाऊंटवरुन पवारांना धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याला अटक झाली पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घ्यावी. असे अजित पवार म्हणाले.