शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आले आहेत. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात राऊत यांची चौकशी सुरू आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याच संदर्भात अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
याच पार्श्वभमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांची ईडीकडून पुन्हा पुन्हा का चौकशी केली जात आहे, याबाबत राऊत साहेबच बोलू शकतील. देशातील कोणत्याही नागरिकाची चौकशी करण्याचा अधिकार त्या यंत्रणांना आहे. असे ते म्हणाले.
यासोबतच अनेक संस्था आणि व्यक्तींना ईडीच्या अनेक वेळा नोटीस आलेल्या आहेत. त्या यंत्रणांना स्वायत्तता दिलेली आहे. त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे, त्या मग आयटी असेल ईडी असेल किंवा राज्य सरकारच्या एसीबी असेल सीआयडी असेल किंवा पोलीस क्राईम ब्रँच असेल या सर्व वेगवेगळ्या विभागांमध्ये काही जर तक्रार आली असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा या यंत्रणा का येतात त्या संदर्भात जास्त राऊत साहेब सांगतील. अजित पवार हे सध्या मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.