ताज्या बातम्या

“एकनाथ शिंदे आमच्यासोबत असताना चांगले होते, ‘तिकडे’ गेल्यापासून जरा काम बिघडलंय - अजिप पवार

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव महागणपती गावाच्या ग्रामसचिवालयाचा लोकार्पण सोहळा झाला.

Published by : Siddhi Naringrekar

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव महागणपती गावाच्या ग्रामसचिवालयाचा लोकार्पण सोहळा झाला. या कार्यक्रमाला अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला आहे.

अजित पवार म्हणाले की, आमचं सरकार असताना एसटी आंदोलनातही काही शहाणे आमदार तिथे जाऊन झोपले होते. एकजण म्हणायचा डंके की चोट पे करूंगा, डंके की चोट पे करूंगा आता डंका कुठे गेला? असे म्हणाले. यासोबतच मध्यंतरी योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. त्यांनी इथे येऊन गुंतवणूक नेली. मात्र आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शांत बसले आहेत. बॉलिवूडही ते उत्तर प्रदेशात घेऊन चाललेत आता हे बॉलिवूड तरी ठेवणार का इथे? असाही प्रश्न अजितदादांनी विचारला. जे ४० लोक यांच्यासोबत गेले त्यातल्या सगळ्यांना सांगितलंय तुला मंत्री करतो, मंत्री करतो. मंत्रिमंडळ ४३ च्या पुढे नेता येत नाही त्यामुळे यांची अडचण होते. असे देखिल अजित पवार म्हणाले.

तसेच एकनाथ शिंदे आमच्याकडे होते तेव्हा चांगले होते. आता जरा काम बिघडलं. हे बघा आता काम बिघडलं म्हणजे थेट हेडलाइनच होणार, दोन लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. आम्हाला सभागृहात मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाचा उल्लेख केला होता. पण हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर काही बोलायला तयार नाही. नंतर म्हणाले आता तो गेला जाऊदेत दुसरा आणू. कशाचा दुसरा आणता? अहो बेरोजगारी किती वाढली आहे जरा बघा. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर सुरूवातीला हे दोघंच टिकोजीराव होते. आता २० मंत्री आहेत अजून विस्तार झालेला नाही. मी पालक मंत्री असताना चटचट निर्णय घेत होतो. आता बघू, करू असं धोरण आहे. मंत्र्यांचा वेळ महत्त्वाचा आहे पण लोकांचा वेळ नाही का? असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

नोमानींच्या व्हिडिओवर आशिष शेलारांची सडकून टीका, फडणवीसांनीही भरसभेत ऐकवली ऑडिओ क्लिप

Latest Marathi News Updates live: आदित्य ठाकरे यांचा मुंबई मेट्रोतून प्रवास

New Zealand Member Of Parliament: कोण आहे न्यूझीलंडची ती तरुण आक्रमक खासदार? जाणून घ्या...

औषधी गुणधर्म असणाऱ्या आवळ्यापासून घरच्याघरी बनवा चांगल्या प्रतीचा च्यवनप्राश

Nana Patole On Mahayuti:अजित पवारांसह महायुतीवर पटोलेंचा निशाणा, भ्रष्ट्राचारी व्यवस्था म्हणजे भाजप...