उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावर आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केल आहे. अजित पवार हे शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा रवी राणा यांनी केला आहे. ते अमरावतीत माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शरद पवार व अजित पवार यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाल्या असेल. तर लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडेल व शरद पवार हे मोदी सोबत येऊन सरकार मजबूत करेल. तसेच आगामी काळात काँग्रेससह अनेक नेते मोदींना पाठींबा देतील व विरोधी पक्षात कमी लोक राहतील असा दावा रवी राणा यांनी केला आहे.
राष्ट्रवादीतील बंडानंतर काल अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील बाणेर येथील निवासस्थानी दोघांमध्ये भेट झाली. यानंतर अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेक चर्चाणा उधाण आलं आहे.