Ajit Pawar Team Lokshahi
ताज्या बातम्या

बारामतीच्या विकासाबाबत झाकली मूठ सव्वा लाखाची - अजित पवार

ड्रायव्हर म्हणून मी बसतो, साहेबांना कंडक्टर करतो अन् सुप्रियाला सांगतो तिकीट काढ; अजित पवारांची तुफान फटकेबाजी

Published by : Sudhir Kakde

बारामती | रुपेश होले : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राज्यातील वेगवेगळ्या भागांत होणाऱ्या सभा नेहमीच चर्चेचं कारण ठरत असतात. अजित पवार यांची खास शैली ही त्यांच्या प्रत्येक भाषणात दिसून येते. त्यातच आज बारामतीमध्ये (Baramati) अजित पवार यांच्या भाषणातील एक खास किस्सा सध्या चर्चेचं कारण ठरतोय. विकास कामांसाठीच्या निधीबद्दल बोलत असताना अजित पवार म्हणाले, कुणाच्या खात्यात किती पैसे आले, हे मी सांगणार नाही. कारण हे चॅनलवाले लगेच बारामतीत कसं चाललंय.. हे सगळीकडेच दाखवतील. अजित पवारांच्या या वाक्यावर एकच हशा पिकला.

अजित पवार यांनी पुढे बोलयला सुरुवात केली. ते म्हणाले, चांद्यापासून बांद्यापर्यंत चालावं. लगेचच एक कार्यकर्ता म्हणाला की, साहेब एवढा एवढा निधी आला आहे. अजित पवारांनी पुन्हा त्या कार्यकर्त्याला थांबवत, "तू बोलू नकोस शहाण्या... आपली झाकली मूठ सव्वा लाखाची" असं म्हणत बारामती काय पण जिल्ह्याला राज्याला देखील निधी मिळावा आणि विकास कामं व्हावीत असं सांगत बारामतीत होत असलेल्या विकास कामाबाबत स्पष्टीकरण दिलंय. बारामती तालुक्यातील विकास कामांच्या पाहणी दरम्यान ते गावकऱ्यांशी बोलत होते.

ड्रायव्हर म्हणून मी बसतो, साहेबांना कंडक्टर करतो, आणि सुप्रिया ला सांगतो तिकीट काढ...

बारामती तालुक्यातील विकासाबाबत बोलत असताना विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गाड्यांची सोय करावी असं एका कार्यकर्त्यांनं सांगितलं. यावर अजित पवार म्हणाले, होय बाबा सगळी सगळी सोय करायची. आता मी ड्रायव्हर म्हणून बसतो, पवार साहेबांना कंडक्टर करतो आणि सुप्रियाला म्हणतो तू तिकीट काढ...असं अजित पवार म्हणाले अन् हशा पिकला. यानंतर सभेत एकच हाशा पिकला.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी