Maharashtra Assembly Budget 2024  
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Budget 2024 Live : राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवार कोणत्या घोषणा करणार? वाचा सविस्तर अपडेट्स

राज्याचा अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार कोणत्या घोषणा करणार? लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचा सविस्तर माहिती.

Published by : Naresh Shende

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी केल्या 'या' मोठ्या घोषणा

सभागृहात विठुनामाच्या जयघोषाणं राज्याच्या अर्थसंकल्पाचा नारळ फुटला

१) लेक लाडकी, जननी सुरक्षा योजना सरकारनं राबवली

२) महिला सक्षमीकरण, बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत

३) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आलीय.

४) महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार

५) वार्षिक एकूण ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद, जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

६) वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार

७) महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळणार

८) शुभमंगल योजनेचं अनुदान २५ हजार रुपयांपर्यंत करण्यात आलं आहे.

९) गरोदर महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळणार, जुन्या रुग्णवाहिकेऐवजी नवीन रुग्णवाहिका देण्यात येतील.

१०) मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करण्यात आलीय, तब्बल ५२ लाख कुटुंबांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

११) वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळतील.

१२) अहिल्याबाई होळकर स्टारअप योजनेला प्रारंभ

१३) लघुउद्योजक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरु केली जाणार.

१४) ई-पंचनामा पद्धत राज्यभर लागू केली जाणार आहे. नागपूरच्या यशस्वी प्रयत्नानंतर राज्यभर योजना सुरु केली जाईल.

१५) विदर्भ-मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांना आर्थिक मदत केली जाईल.

१६) ११ लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात

१७) गाव तिंथ गोदाम योजना राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० गोदामांची निर्मिती केली जाणार आहे.

१८) खरीप आणि रब्बी हंगामातील कडधान्य खरेदीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

१९) कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत केली जाणार.

२०) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रतिक्विंटलमागे अनुदान दिले जाणार.

२१) ६ लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १ हजार रुपये अनुदान मिळणार.

२२) लिटरमागे ५ रुपये अनुदान योजना १ जुलैपासून सुरु राहणार

२३) दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान

२४) अटल बांबू संवर्धन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान मिळणार

२५) बांबू रोपामागे १७५ रुपये अनुदान देणार

२६) वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृतांच्या नातेवाईकांना २० लाख रुपये दिले जाणार, गंभीर जखमी झाल्यास ५ लाख रुपयांची मदत मिळणार

२७) १०८ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, या प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.

२८) सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून कर्ज घेण्यात येईल.

२९) म्हैसाळ येथे पथदर्शी सौरउर्जा प्रकल्प राबवण्यात येईल.

३०) शासकीय उपसा सिंचन योजनांचं सौरउर्जीकरण करण्यात येणार आहे.

३१) जलयुक्त शिवार योजनेसाठी ६५० कोटी रुपयांची तरतूद

३२) शासकीय उपसा सिंचन योजनांचं सौरउर्जीकरण करणार

३३) शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी १५ हजार कोटींचा प्रकल्प

३४) गरजू शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप देण्यासाठी तरतूद

३५) युवावर्गाला सक्षम करण्यासाठी कौशल्य उद्योजकता विकास योजना सुरु करणार.

३६) १० लाख तरुण-तरुणींना प्रशिक्षण योजना

३७) दरमहा १० हजार विद्यावेतन देण्यात येईल.

३४) मॉडेल आयटीआय कौशल्य विद्यापीठाचं सक्षमीकरण करण्यात येईल.

३५) तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणार.

३६) ५२ हजार तरुणांना नोकरीच्या संधी मिळाल्या

३७) बार्टा, सारथी, महाज्योतीतून २ लाख ५१ हजार तरुणांना प्रशिक्षण

३७) विद्यार्थ्यांना ३८ ते ६० हजार वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जाईल.

३८) विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

३९) उसतोड कामगारांच्या मुलांसाठी ८२ वसतिगृह बांधण्यात येतील.

४०) १ लाख लोकसंख्येमांग १०० डॉक्टर करण्याचं लक्ष्य आहे.

४१) जालना, हिंगोली, धाराशिव, वर्धा, सातारा, रत्नागिरी, अंबरनाथ, पालघर इथं वैद्यकीय महाविद्यालये होणार.

४२) महापे, नवी मुंबई, इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारणार

४३) ५० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून १ लाख रोजगारनिर्मीती केली जाईल.

४४) जनतेचं राहणीमान उंचावण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

४५) बालकांच्या उपोषणासाठी अमृत आहार योजना राबवणार

४६) बौद्ध, शीख, पारशी समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे.

४७) संजय गांधी निराधार योजनेचे अर्थसहाय्य दीड हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल.

४८) दिव्यांगांनाही दरमहा दीड हजार रुपये मानधन मिळणार.

४९) महामंडळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विकास योजना सुरु केल्या जातील.

५०) संत श्री रुपलाला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल.

५१) दिव्यांग कल्याण विभागाचं कामकाज सुरु झालं आहे.

५२) दिव्यांगांना ३४ हजार घरकुल बांधून देणार

५३) दिव्यांगांसाठी आनंद दिघे घरकूल योजना

५४) राज्यातील सर्व कुटुंबांना जनआरोग्य योजना लागू केली जाणार

५५) १९०० रुग्णालयांना जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार

५६) शहरी भागातील गरजू लोकांची आरोग्य तपासणी विनामुल्य केली जाणार

५७) आपला दवाखाना ३४७ ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे.

५८) गिरणी कामगारांना १२ हजार ९५४ सदनिका देण्यात येतील, उर्वरित गिरणी कामगारांना लवकरच घरं देण्यात येतील.

५९) महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी प्रकल्प राबवणार

६०) मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेला प्रारंभ

६१) शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

६२) शिवडी-वरळी जोडरस्त्याचं ५७ टक्के काम पूर्ण झालं आहे.

६३) परिवहन सेवेत सुधारणा करण्यासाठी मनपांना अत्याधुनिक बस मिळणार

६४) २५०० ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे.

६५) महाबळेश्वर विकास, प्रतापगड विकास योजना राबवणार

६६) माळशेज घाटात सर्वसोयीयुक्त गॅलरी उभारणार

६७) रामटेक विकास आराखड्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद

६८) अण्णाभाऊ साठे संशोधन प्रकल्पासाठी निधी दिला जाईल

६९) शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बळीराजा वीज सवलत योजना सुरु केली जाईल

७०)

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश