ताज्या बातम्या

Ajit Nawale : दूधाची पावडर शिल्लक असताना 15 हजार टन दूधाची पावडर का आयात केली गेली? याचं उत्तर केंद्र सरकारकडे नाही

केंद्र सरकारने 15 हजार टन दुधाची पावडर आयात करुन दूध उत्पादकांवर पुन्हा एकदा जिव्हारी घाव घातलेला आहे. असं अजित नवले यांनी म्हटले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

केंद्र सरकारने 15 हजार टन दुधाची पावडर आयात करुन दूध उत्पादकांवर पुन्हा एकदा जिव्हारी घाव घातलेला आहे. असं अजित नवले यांनी म्हटले आहे. देशभरामध्ये साडेतीन लाख दुधाची पावडर वेगवेगळ्या गोदामांमध्ये पडून आहे. दूधाचे अतिरिक्त उत्पादन झाल्याचे आणि त्यातून 35 रुपये झालेलं दूधाचे भाव हे 24 रुपयांपर्यंत खाली पाडण्यात आलेलं आहेत. दूधाचा उत्पादन खर्चसुद्धा त्यातून भरुन निघत नाही.

त्यामुळे आजपासून महाराष्ट्रभर दूध उत्पादक रस्त्यावर उतरत आहेत, आंदोलन करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर दूधाची पावडर शिल्लक असताना ही 15 हजार टन दूधाची पावडर का आयात केली गेली याबद्दलचं कोणतेही उत्तर केंद्र सरकारकडे नाही. दूध उत्पादकांना अधिक खड्ड्यात घालण्याच हा निर्णय केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावा.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, देशभरामध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी अनुदान देऊन ही पावडर कशाप्रकारे देशाबाहेर जाईल आणि दूध उत्पादकांना त्यातून 2 रुपये कसं मिळतील याच्यासाठी प्रयत्न करावे. अशाप्रकारची मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीच्यावतीने आम्ही करतो आहोत. असे अजित नवले म्हणाले.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश