Ajay Baraskar Press Conference : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० जुलैला अंतरवाली सराटील उपोषण सुरु केलं होतं. परंतु, पाच दिवसानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सलाईन लावून उपोषण करण्यात काहीही अर्थ नाही, असं म्हणत जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं आहे. मागण्या मान्य करण्यासाठी जरांगे यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतचा कालावधी दिला आहे. अशातच अजय महाराज बारस्कर यांनी जरांगेविरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. बारस्करांनी पत्रकार परिषदेत जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पत्रकार परिषदेत अजय महाराज बारस्कर काय म्हणाले?
माझा प्रश्न असा आहे, तुम्हाला कोणत्या लोकांनी उपोषणाला बसायचा आग्रह केला होता? काल उठायचा आग्रह अनेक लोकांनी केला. पाटी तुम्ही उपोषण करून मरा, असं मराठा समाजाचे किती लोक म्हणाले होते, हे तुम्ही जाहीर करा. कुणीच म्हटलं नसेल, पण म्हटलं असेल, तर बारामतीची शक्यता जास्त आहे.मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, हा माणूस लबाड आहे. याच्या पोटात एक आणि ओठात एक आहे. आज ते समोर दिसलं आहे. आम्ही प्राणाणिकपणासाठी त्यांच्यावर प्रेम केलं आहे. त्यांनी गुप्त बैठका घेतल्या.
लोणावळा, वाशी, अशोक चव्हाणांसोबत बैठक घेतली. त्यांनी सर्व गुप्त बैठका घेतल्या. सगेसोयऱ्यांमुळे मराठ्यांचे कोट्यावधी मुलं जिल्हाधिकारी कसे होणार? जरांगे म्हणतो, माझ्या कोट्यावधी लेकरांना अधिकारी, जिल्हाधिकारी करायचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. जरांगे महाराष्ट्रात फक्त ३२३ जिल्हाधिकारी येतात. कोट्यावधी कुठून आले? लोकांना असं दाखवायचं की, मी तारणहार, ब्रम्हदेव आहे. ज्याला सुरुवात असते, त्याचा शेवट निश्चित असतो.
जरांगेचा शेवट आता सुरु झालेला आहे. सगेसोयऱ्यांमुळं मराठा समजाचं कल्याण कसं होईल? हा माझा प्रश्न आहे. तुझी बुद्धीमत्ता काय आहे, हे समाजाला कळलं पाहिजे. कायद्याच्या तज्ज्ञांसमोर बसून लाईव्ह सांग, समाजाचं कल्यणा कसं होतंय, हा डबल ढोलकी माणूस आहे. काहीही मागण्या मागतोय. याने कितीवेळा पटल्या मारल्या, १४ ऑक्टोबरची कोट्यावधी लोकांची सभा पाहिली तर तेव्हाच्या मागण्या आणि आत्ताच्या मागण्यांमधील फरक समजेल. जरांगेनी सर्व भोळे लोक मला मारण्यासाठी माझ्यावर दुश्मनासारखे सोडून दिले. मला फरक पडत नाही. ज्याला जन्म आहे, त्याला मरण आहे. माझं मरण कधी लिहिलंय मला माहित नाही. पण शेवटपर्यंत मीसत्य सांगण्याचं काम करणार आहे, असंही बारस्कर म्हणाले.