ताज्या बातम्या

पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली; हडपसर परिसरातील हवा धोकादायक पातळीवर; श्वसनास त्रास

पुण्यातील हवेची गुणवत्ता दिवाळीनंतर खालावली आहे. हडपसर परिसरातील हवा धोकादायक पातळीवर पोहोचली असून, श्वसनास त्रास होण्याची शक्यता आहे.

Published by : shweta walge

पुणे शहरातील हवेची गुणवत्ता खालाववली आहे. दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी फटाके फोडले जात आहेत. परिणामी पुण्यात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित झाली आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे काही भागातील हवा तर धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. यामुळे श्वसनास त्रास होण्यासह आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. शुक्रवारी रात्री लक्ष्मीपूजनानंतर शहर आणि उपनगरांमध्ये हवेची गुणवत्ता 115 निर्देशंकावर पोहोचली आहे.

लक्ष्मीपूजन झाल्यानंतर उडवलेल्या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. या धूरकट वातावरणाचा परिणाम शनिवारीही दिसून आला.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक शिवाजीनगर येथे २५४, भूमकरनगर येथे १७४, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे २९८, कर्वे रस्ता येथे २०९, हडपसर येथे २८१, लोहगाव येथील म्हाडा कॉलनी येथे १५४, पंचवटी येथे १९६ नोंदवला गेला.

वाईट स्तरात २०१ ते ३०० या दरम्यान निर्देशांक असल्यास सर्वांवरच त्याचा विपरीत परिणाम होतो. अतिवाईट स्तरात ३०० पेक्षा जास्त निर्देशांक असल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती