आज अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे अखेरचे हे अधिवेशन होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण या अर्थसंकल्पानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.
अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. निर्मला सितारमण म्हणाल्या की, राई, तीळ, शेंगदाणा यांसारख्या पिकांच्या उत्पादनाला सरकार आणखी प्राधान्य देणार. सरकारच्या वतीनं 5 इंटीग्रेटेड एक्वा पार्कही सुरु करण्यात येणार.
तसेच PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे. 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ दिला. दुग्ध उत्पादकांच्या मदतीसाठी योजना आखण्यात येणार आहे. मोहरी आणि भुईमूग लागवडीलाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे. नॅनो युरियाच्या यशानंतर आता नॅनो डीएपीचा प्रयोग करण्यात येणार आहे. मत्स्यपालन योजनेला चालना देणार. शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवर भर देण्यात आला आहे. निर्मला सीतारमण यांनी सांगितले.