Agnipath Scheme Team Lokshahi
ताज्या बातम्या

बहिण BSF मध्ये, गोळीबारात ठार झालेला राकेश करत होता सैन्यदलाची तयारी

अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ झाला. येथे गोळीबारात दमेरा राकेश (24 वर्षे) नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला.

Published by : Team Lokshahi

नवी दिल्ली : लष्कर, नौदल आणि वायूदलात सैनिक भरतीसाठी केंद्र सरकारने मंगळवारी अग्निपथ योजना (Agnipath Scheme) जाहीर केली आहे. मात्र, या योजनेला देशातील युवकांनी विरोध दर्शविला आहे. तर काही ठिकाणी या विरोधाला हिंसक वळण लागले आहे. अग्निपथविरोधी आंदोलनात (Agnipath Scheme Protest) सर्वाधिक फटका रेल्वेला बसला. दरम्यान तेलंगणातील सिकंदराबादमध्ये शुक्रवारी अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ झाला. येथे गोळीबारात दमेरा राकेश (24 वर्षे) नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला.

राकेश हा तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याची बहीण बीएसएफमध्ये कार्यरत आहे. तर वडील टीआरएसचे नेते असून शेतीही करतात. या घटनेवरून राजकारणही चांगलेच तापले आहे.

राकेशच्या वडिलांचे नाव डमेरा कुमारस्वामी आणि आईचे नाव पुल्लम्मा आहे. राकेशची मोठी बहीण राणी बीएसएफमध्ये कर्मचारी आहे. राकेशने लष्कराची शारीरिक चाचणीही पूर्ण केली होती आणि लेखी परीक्षाही उत्तीर्ण केली होती. राकेश तीन वर्षांपासून लष्कराच्या परीक्षेची तयारी करत होता. पदवी पूर्ण केल्यानंतर राकेश वारंगलमध्ये कोचिंग करत होता. बहीण राकेशला खूप प्रेरित करत असे. यामुळेच त्यांनी सैन्यात भरती होण्याची तयारीही केली.

टीआरएसचा केंद्रावर आरोप

सुरक्षा कर्मचार्‍यांनी केलेल्या गोळीबारात राकेशचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. या घटनेमुळे तेलंगणातील सत्ताधारी टीआरएस आणि विरोधी भाजपमधील वाद वाढला आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राकेशच्या मृत्यूसाठी केंद्राच्या सदोष धोरणाला जबाबदार धरले आहे.

परिवारातील एकास नोकरी

सीएम राव यांनी राकेश यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. राकेशच्या कुटुंबीयांना 25 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. पात्रतेनुसार कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

असा झाला गोळीबार

जीआरपी (सिकंदराबाद) पोलीस अधीक्षक बी अनुराधा यांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी सकाळी 9.15 वाजता घडली. येथे सैन्यात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या काही उमेदवारांना त्यांची लेखी परीक्षा रद्द होण्याची भीती होती. अशा स्थितीत तो रेल्वे स्थानकावर आला आणि हिंसाचारात अडकला. त्यांची शारीरिक चाचणी करण्यात आली. आंदोलक प्रवासी म्हणून स्थानकात घुसले होते. सुमारे 1500-2000 आंदोलकांनी रेल्वेचे काही डबे पेटवले आणि रेल्वे आणि पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेकही केली.

36 तासांनंतर आमदार श्रीनिवास वनगा घरी परतले मात्र पुन्हा निघून गेले

बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; येरवडा कारागृहामध्ये आरोपींची ओळख परेड

36 तासांनंतर आमदार श्रीनिवास वनगा घरी परतले मात्र पुन्हा निघून गेले

Amit Thackeray : कोळी बांधवांनी भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे ट्विट करत म्हणाले...

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' दिवशी येणार पुणे दौऱ्यावर