विधानभवन परिसरात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. विधानभवनाच्या मुख्य गेटवर दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारने दूध भुकटी आयात केल्याने दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यावर दूध ओतून या शेतकऱ्यांना आंदोलन केलं आहे. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.