लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. देशातील 8 राज्यांतील 49 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे.
महायुतीचे उत्तर मध्य मुंबई लोकसभा उमेदवार उज्ज्वल निकम हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आज उज्ज्वल निकम यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. मला अतिशय आनंद आहे. आज एवढ्या सकाळी देखील या मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी ओसंडून वाहत होती.
यासोबतच ते म्हणाले की, प्रत्येकाला मतदान करण्याची उत्सुकता होती. मतदान करणं हा लोकशाहीतील एक उत्सव आहे. जो संविधानाने आपल्याला दिलेला आहे. असं उज्ज्वल निकम म्हणाले.