ताज्या बातम्या

Hoarding Collapse Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे पालिका प्रशासनाची अनधिकृत होर्डिंग्सवर धडक कारवाई

Published by : Dhanshree Shintre

सोमवारी घाटकोपरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. मुंबईत वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये पडलेल्या होर्डिंगमुळे 14 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबईतील घाटकोपरमध्ये पुणे पालिका अ‍ॅक्शनमोडवर आली आहे. पुणे शहरात 1 हजार 564 अनधिकृत होर्डिंगसवर पुणे महापालिकेने कारवाई केली आहे.

पुणे शहरात असलेल्या सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. शहरात एकूण 2500 होर्डिंग्स आहेत. या सगळ्या होर्डिंग्सची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जर अनधिकृत असेल तर त्याचा परवाना रद्द करुन कारवाई केली जाणार आहे. जे नीट नाहीत आणि धोकादायक आहेत. त्यावर कारवाई करण्याचे देखील आदेश दिले आहेत.

शहरामध्ये अडीच हजार होर्डिंग्सला परवानगी आहे. मात्र तेवढेच होर्डिंग अनधिकृत आहेत. याची सगळी चौकशी करणं सुरु आहे. अनधिकृत असेल तर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. 2598 अधिकृत होर्डिंग्स आहेत. शहरात फक्त 85 अनधिकृत होर्डिंग्स आहेत. यात सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग्स हडपसरमध्ये आहेत. 2300 होर्डिंग्सचे ऑडिट झाले आहे. त्यातील आतापर्यंत एकूण 1564 अनधिकृत होर्डिंग्सवर पुणे पालिकेने कारवाई केली आहे. येत्या काळात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा