ताज्या बातम्या

शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवारांचे ट्विट म्हणाले...

शरद पवारांनी एक मोठी घोषणा केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शरद पवारांनी एक मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात या मोठ्या घोषणा केल्या आहेत. दिल्लीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राज्यातील निवडणुकांची जबाबदारी ही सुप्रिया सुळेंवर देण्यात आली आहे.

सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, पंजाब, हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे तर प्रफुल पटेल यांच्यावर गुजरात, मध्यप्रदेश, राज्यस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही आहे. या घोषणेनंतर आता अजित पवार आणि राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली 'हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…' हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन! असे अजित पवार म्हणाले.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी