ताज्या बातम्या

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

रुळावरून घसरलेला डबा रेल्वे प्रशासनाकडून ४ तासांनी बाजूला करण्यात आला. तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली.

Published by : Sakshi Patil

सीएसएमटी स्थानकाजवळ हार्बर लाइन वरील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर जाणाऱ्या एका लोकलचा डबा घसरला होता. सकाळी 11:35ची ही लोकल पनवेलवरून सीएसएमटी स्थानकवर जात होती, त्याआधीच एक डब्बा रुळावरून घसरला.

लोकलचा वेग कमी असल्यामुळे कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. हार्बर आणि मुख्य मार्गावरील वाहतूक यामुळे बंद केल्या आहे. मात्र, आता वाहतूक अखेर सुरू झाली आहे. रुळावरून घसरलेला हा डबा रेल्वे प्रशासनाकडून ४ तासांनी बाजूला करण्यात आला. तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली. त्यामुळे मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय