ताज्या बातम्या

36 तासांनंतर आमदार श्रीनिवास वनगा घरी परतले मात्र पुन्हा निघून गेले

पालघर विधानसभेची उमेदवारी न दिल्यामुळे आमदार श्रीनिवास वनगा नाराज झाले

Published by : Siddhi Naringrekar

पालघर विधानसभेची उमेदवारी न दिल्यामुळे आमदार श्रीनिवास वनगा नाराज झाले असून ते घर सोडून निघन गेले होते. मात्र 36 तासांनंतर आमदार श्रीनिवास वनगा घरी परतून कुटुंबीयांना भेटले असल्याची माहिती मिळत आहे.

मात्र पहाटे श्रीनिवास वनगा हे घरी येऊन कुटुंबीयांना भेटून पुन्हा बाहेर गेले असल्याचं त्याच्या पत्नी सुमन वनगा यांनी सांगितले. आमदार श्रीनिवास वनगा मध्यरात्रीच्या सुमारास घरी येऊन पुन्हा बाहेर गेल्याची माहिती मिळत आहे.

रात्री तीन वाजताच्या सुमारास घरी आलेले वनगा आपल्या मित्रांसोबत पुन्हा अज्ञातवासात गेले असल्याची माहिती मिळत आहे. श्रीनिवास वनगा यांचा फोन 36 तासांपासून बंद होता त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. मात्र 36 तासांनंतर आमदार श्रीनिवास वनगा यांनी घरी परतून कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 'यंदा पंजा' हे गाणे केलं लाँच

म्हाडाचा कारभार आता होणार पेपरलेस; ई-ऑफिस प्रणाली लवकरच सुरू

Satara: जिल्ह्यात 215 जणांचे अर्ज; चुरस वाढली

राजकीय पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; नाराजांकडून थेट अपक्ष अर्ज

नवी मुंबईच्या खारघरमधून 27 लाखांचं ड्रग्ज जप्त