ताज्या बातम्या

‘या’ वेब सिरीजमधून सुचली प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवणाऱ्या आफताबला हत्येची कल्पना

दिल्लीत झालेल्या तरुणीच्या हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

दिल्लीत झालेल्या तरुणीच्या हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकले. लग्नाचा तगादा लावत असल्याने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले. श्रद्धा वालकर ही मूळची मुंबई जवळच्या वसईतील राहणारी आहे. मयत श्रद्धा आणि तिचा बॉयफ्रेंड आफताब मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि मग मैत्रीचे प्रेमात रुपांतर प्रेमात झाले.

यानंतर दोघेही दिल्लीत शिफ्ट झाले आणि लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. घरच्यांचा विरोध झुगारून दोघेही मे महिन्यात दिल्ली येथे राहण्यासाठी गेले होते. हे प्रेमसंबंध जुळल्याचे तिने आपल्या घरी सांगितल्यावर घरच्यांनी तिला विरोध केला होता. काही दिवसांमध्येच कोणत्यातरी काही कारणांमुळे दोघांमध्ये मध्ये भांडण सुरु झाले. या दरम्यान आफताब याने १८ मे ला श्रद्धाचा गळा आवळून हत्या केली व नंतर तिचे शरीराचे ३५ तुकडे करून दररोज एक एक तुकडा जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. अतिरिक्त डीसीपी-वन अंकित चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या दोघांची भेट एका डेटिंग अॅपवर मुंबईत असताना झाली. दोघे मागील तीन वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहत होते. नोकरीनिमित्त ते दिल्लीत स्थायिक झाले होते. दिल्लीत स्थायिक झाल्यानंतर श्रद्धाने आफताबकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने याच संतापातून तिची हत्या केली.”असे त्यांनी सांगितले.

याच पार्श्वभूमीवर आफताबने दिलेल्या जबाबामध्ये अनेक चित्रपट आणि वेबसिरीज पाहिल्यानंतर त्याला अशाप्रकारे हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना सुचल्याचं सांगितलं आहे. यामध्ये आफताबने एका अमेरिकन क्राइम वेबसिरीजचंही नाव घेतलं आहे. दररोज रात्री मृतदेहाचा एकेक तुकडा घेऊन तो मेहरोलीच्या जंगलात नेऊन फेकत असे. श्रद्धाची हत्या करण्याआधी आफताबने अनेक गुन्हेगारी कथानक असलेले चित्रपट आणि वेब सिरीज पाहिल्या होत्या. यामध्ये अमेरिकन क्राइम ड्रामा असलेल्या ‘डेक्सटर’चाही समावेश होता, असं पोलिसांनी सांगितलं. तसेच “आरोपीने मृतदेहाचे तुकडे केल्याचा जबाब नोंदवला आहे. त्यानंतर तो हे तुकडे छत्तरपूर येथील जंगली भागामध्ये एक-एक करुन नेऊन फेकायचा. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे,” असं दक्षिण द्लिलीचे अतिरिक्त डीसीपी-वन अंकित चौहान यांनी सांगितलं.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण