हर्षल भदाणे पाटील|नवी मुंबई : नवी मुंबई परिसरात असणाऱ्या खाद्य तेलविक्रेते व्यवसायिकांकडून खाद्यतेलांमध्ये होणाऱ्या भेसळी बाबत तसेच दूध, मिठाई व दुग्धजन्य पदार्थ भेसळी बाबत तात्काळ संयुक्त कारवाईची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केली. अन्न व औषध प्रशासन सहा.आयुक्त सुरेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली.
नवी मुंबई परिसरात साधारण पंधरा लक्ष लोक संख्या असून येथे नागरिकांना मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची गरज सणांना म्हणून वापरण्यात येतात परंतु शुद्ध खाद्यतेलांची रोजची वाढती मागणी व अपुरा पुरवठा या बाबी लक्षात घेता नवी मुंबईत असणाऱ्या बहुतेक खाद्यतेल विक्रेते हे भेसळ युक्त तेलाचे डबे तेल वापरत असल्याचे निदर्शनास येत असून यात मोठ्या प्रमाणात हलके दर्जाचे तेल तसेच त्यांना वास येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची केमिकल वापरली जात आहेत.या प्रकारामुळे नवी मुंबईतील नागरीकांनचे आयुष्य धोक्यात येत आहे. तसेच दूध,मिठाई व दुग्धजन्य पदार्थ यात सुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
मनसेच्या सहकार सेना या विषयाला घेऊन चांगलीच आक्रमक झाली आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून तत्काळ संयुक्त रित्या तपासणी करून दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सहकार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केली.
या वेळी अन्न व औषध प्रशासन सुरेश देशमुख यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देऊन अहवाल प्राप्त करण्यास सांगितले आहे.या वेळी सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदें, सत्यवान गायकवाड व कार्यकर्ते उपस्थित होते.