ताज्या बातम्या

'मुख्यमंत्र्यांनी स्वतःची एफडी नक्कीच वाढवली' मुख्यंमंत्र्याच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'बीएमसाची एफडी वाढली, आधी पैसे कुठे जायचे?' असा सवाल ठाकरे गटाला केला होता. यावरच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत '

Published by : shweta walge

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'बीएमसाची एफडी वाढली, आधी पैसे कुठे जायचे?' असा सवाल ठाकरे गटाला केला होता. यावरच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत 'घटना बाह्य मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या एफडी नक्कीच वाढवले असतील अशी टीका केली आहे. ते आज दिंडोशी येथे युवा सेनेतर्फे स्वेट ऑन स्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

घटना बाह्य मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या एफडी नक्कीच वाढवले असतील. पण घाबरू नका 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच. मुंबई महाराष्ट्राची लूट सुरू आहे. हे सरकार आणि प्रशासन आम्हाला उत्तर देत नाही दिल्लीला उत्तर देत आहेत.

पालिकेला दक्षिण मुंबईच्या रोड संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत मात्र अजूनही उत्तर दिले नाही. आम्ही विचार करतोय याच्यावर हक्कभंग वगैरे आणायचा. पालिकेला आम्ही प्रश्न विचारले मात्र ते उत्तर देत नाही. हा मुद्दा आम्ही अधिवेशनात घेऊ, पुढील लढाई कोर्टात नेऊ असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, आमचं सरकार असताना प्रत्येक प्रकल्प संदर्भात प्रत्येक एजन्सीला घेऊन आम्ही बसायचो चर्चा करायचो. प्रत्यक्षात जाऊन कामाची पाहणी करायचो. ऑक्टोंबरच्या आसपास वरळी शिवडी कनेक्टर व्हायला हवा होता. मात्र अजून झाला नाही, असे अनेक प्रकल्प आहेत. जे लवकर पूर्ण होणार होते मात्र या सरकारचे लक्ष नाही. खोक्यांसाठी अनेक प्रकल्प लेट केले आहेत. मुंबईतले दहिसर ,वरळी आणि इतर असे अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले आहेत.

ज्यांची त्यांना भीती वाटते त्यांना असा बदनाम करायचं ते काम करतात. अधिवेशन आल की असं ते वातावरण निर्माण करतात. भीती चांगली आहे. आरोप लावने त्यांची पॉलिसी झाली आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायची त्यांची सवय. राज्यात अनेक प्रकल्प गुरातला गेले आम्ही राज्यासाठी लढू. देश विकला तसं मुंबई विकू देणार नाही. आरक्षण मुद्दा आहेच मात्र रोजगार हा मोठा मुद्दा आहे. हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचं नाही गुजरातच्या हिताचे आहे, असं ते म्हणाले आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का