यंदाच्या दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागवल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे महत्त्वाचे मानले जात आहे.
'महायुती सरकार लोकांना बनवतेय'
राज्यात कोणत्याही वेळी आचारसंहिता लागू शकते अशा चर्चा सुरु असताना राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका लावत आहे. मात्र, महायुती सरकार लोकांना बनवत आहे असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच जोपर्यंत अदानींची सगळी कामं, जीआर निघत नाही तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
'स्वत:साठी खोके, महाराष्ट्राला धोके'
आदित्य ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीये. ते म्हणाले की, अदानीच्या घशात मुंबई घालयाची की नाही हे ठरवायचे आहे. शिंदे सरकार हे राज्य विकायला निघालं आहे. आपल्याला एकत्र यावं लागेल, एकजूट दाखवावी लागणार आहे. एकनाथ शिंदेंनी मिंधे सरकारने जेवढा हा महाराष्ट्र भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला आहे. ए टू झेड भ्रष्टाचार केला आहे. मुंबईचंच म्हणायचं झालं. तर रस्त्याचे दोन मोठे घोटाळे केले. मागच्या वर्षी मी रस्त्याचा घोटाळा उघड केला. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं तुमचं नाव बदनाम होणार आहे. तुमच्या हातून उद्घाटन करून घेत आहेत, ही कामे कधी पूर्ण होणार नाही. हा घोटाळा झाला. महापालिकेला मान्य करावं लागलं. त्यामुळे एक हजार कोटी वाचले.’
'मुख्यमंत्री शिंदे यांची केली नक्कल'
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल केली आहे. तसेच यावेळी मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांना चांगलाचा इशारा दिला आहे. ‘आताही सहा हजार कोटीचा घोटाळा झाला आहे. आयुक्तांना सांगतो याद राखा सही केली तर. तुम्ही सही केली, कंत्राटदारा पैसा दिला तर बघा. एक महिन्यात आमचं सरकार येणार आहे. मग ठरवा आत राहायचं की बाहेर.’‘अनेक घोटाळे केले. मी वाट पाहत आहे. सरकार आल्यावर प्रत्येकाची फाईल काढणार आहे. मग तुम्ही मंत्री असाल की अन्य कुणी असाल. ही लूट आम्ही थांबवणार आहे. तुम्ही माझी साथ आणि सोबत देणार की नाही? आम्ही महाराष्ट्राला वाचावणार आहोत.’