नवी दिल्ली : देशाची पहिली सूर्य मोहिम आदित्य L1 आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, आदित्य L1ने पृथ्वी आणि चंद्राचा सेल्फी आणि फोटोही काढले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोशल मीडियावर हे फोटो प्रसिध्द करत माहिती दिली आहे.
इस्रोने 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून सौर मोहिम प्रक्षेपित केली. आदित्य L1 हे सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील L1 बिंदूवर ठेवले जाणार आहे आणि प्रक्षेपणानंतर त्याला पोहोचण्यासाठी 125 दिवस लागतील. त्यानंतरच आदित्य L1 सूर्यावर संशोधन सुरू करू शकेल. त्याचबरोबर चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचल्यानंतर दीर्घ संशोधन करावे लागेल. यासोबतच इस्रो आणखी अनेक मोहिमा सुरू करणार आहे. यामध्ये शुक्र आणि गगनयान मोहिमाचा समावेश आहे.