अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाला नवे वळण आले आहे.
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाला नवे वळण लागले असून २०१६पासून आपण अदानी समूहाची चौकशी केलेली नाही. असे सेबी’ने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ‘सेबी’ने पुरवणी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
2016पासून अदानी समूहातील कंपन्यांची ‘सेबी’मार्फत चौकशी होत असल्याची माहिती पूर्णत: निराधार आहे. आधीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केलेल्या ५१ भारतीय कंपन्यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र अदानी समूहाची भांडवली बाजारात नोंदणी असलेली कंपनी यामध्ये नव्हती. असे प्रमाणपत्रात म्हटले आहे.