थोडक्यात
अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून धमकी
मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज
पोलिसांकडून शोध सुरु
अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली आहे. मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आल्याची माहिती मिळत आहे.
गुरूवारी रात्री 12च्या सुमारास हा धमकीवजा मेसेज आला असून यात 'सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यावर गाणं लिहिण्यात आलं आहे. त्याला सोडणार नाही. एका महिन्याच्या आत गाणं लिहिणाऱ्या व्यक्तीला मारणार.
गाणं लिहिणाऱ्याची हालत अशी करणार की, तो पुढे त्याच्या नावाने गाणं लिहू शकणार नाही. सलमान मध्ये दम असेल तर त्याने त्याला वाचवावं' असा मेसेज करण्यात आला आहे.या प्रकरणी आता मुंबई पोलीस सतर्क झाले असून पोलीस ज्या नंबरहून हा मेसेज आला आहे त्याचा शोध घेत आहेत.