ताज्या बातम्या

रोहिणी खडसेंसह कार्यकर्त्यांचा बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या

रोहिणी खडसे यांच्या प्रचार रॅलीत गोंधळ होऊन कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • रोहिणी खडसेंसह कार्यकर्त्यांचा बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या

  • रात्री दोन वाजेपर्यंत बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या

  • प्रचार रॅलीत गोंधळ होऊन कार्यकर्त्यांना मारहाण

रोहिणी खडसे यांच्या प्रचार रॅलीत गोंधळ होऊन कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. याप्रकरणी रोहिणी खडसेंसह कार्यकर्त्यांनी बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं.

बोदवडच्या जलचक्र तांडा येथे रॅली दरम्यान हा प्रकार घडल्याचा रोहिणी खडसेंनी म्हटलं असून पोलीस ठाण्यात कारवाई होत नसल्याने रात्री रोहिणी खडसेंनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केलं. यासोबतच चक्क रोहिणी खडसेंनी पोलीस ठाण्यातच पंगत मांडत खिचडी देखील खाल्ली.

याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, साधारण साडे नऊ वाजता माझ्या काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली जलचक्र तांड्याला. मी माझ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम करते आहे. त्यांना मारहाण झाली त्याच्यानंतर ते पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला आले आहेत. आमची एवढीच अपेक्षा आहे की, ज्यांनी हल्ला केला किंवा ज्यांनी मारहाण केलेली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असे रोहिणी खडसे म्हणाल्या.

ऐरोलीत गणेश नाईक वि. ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोहर मढवी

PM Modi Speech | 'Rahul Gandhi यांच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट वदवून दाखवा', मोदींचा टोला

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान