भूपेश बारंगे,वर्धा : वर्ध्यातील वडणेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने होळीच्या पर्वावर नाकेबंदी दरम्यान दारूपेट्या भरलेली कार पकडण्यात आली. यादरम्यान चालकाने कारसोडून पसार झाला होता. या कारमध्ये देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या. यात साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून रात्रीच्या सुमारास नाकेबंदी दरम्यान पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये देशी दारूचासाठा असलेली कार सोडून फरार झाला.कारची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या.होळी सणाच्या पर्वावर दारूसाठा आणत असल्याचे दिसून आले.याप्रकरणी फरार आरोपीविरुद्ध वडणेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड ,उपनिरीक्षक लालपालवाले, सुभाष राऊत, संजय राठोड, अमोल ढोबाळे,नितीन मेश्राम यांनी केली.