बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. आता या प्रकरणात आरोपीकडून गुन्ह्याची कबुली देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विशेष तपास पथकाने बदलापूरच्या एका शाळेतील दोन बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे.
कल्याण येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून वैद्यकीय तपासणीवेळी आरोपीकडून गुन्ह्याची कबुली देण्यात आली आहे. आरोपीने वैद्याकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांसमोर गुन्ह्यांतील सहभाग मान्य केला होता, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
या प्रकरणात डॉक्टर, शाळा कर्मचारी, फॉरेन्सिक टीमसह 20 जणांची साक्ष घेण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.